पनवेल सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकाप चे वर्चस्व…

0
34

पनवेल : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या 11 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाचे मनोहर पाटील,राजेंद्र घरत,दत्तात्रय मोरे, रवींद्र पाटील,गणेश गायकर, दिनकर मुंढे,नारायण तुपे, गणेश कोळी, अनंता कांबळे, सौ.मीरा म्हात्रे व सौ. लिला भस्मा यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असून वामन शेळके यांची तज्ञ संचालक म्हणून फेर निवड करण्यात येणार आहे. या सर्व विजयी उमेदवारांना शेकाप च्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील साहेब, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती काशीनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.दत्तात्रय पाटील, शेकाप पनवेल महापालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस राजेश केणी, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती रामशेठ भोईर, जिल्हा परिषद सदस्य राजू गणा पाटील, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका श्रीमती माधुरी गोसावी, नामदेवशेठ फडके, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, देवेंद्र मढवी, दिपक पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.