पवना नदीत बुडाल्याने काले येथील 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

0
193

पवना नगर : काले येथील जॉगिंगसाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा मृतदेह आज पवना नदीकाठी आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.कृष्णा भाऊ कालेकर ( वय 17, रा. कालेगाव, पवना नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत कैलास पोपट कालेकर ( वय- 50 वर्षे, रा. कालेगाव ता. मावळ जि. पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली.मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला र. नोंद क्र. 11/2022 भा.द.वी.कलम 174 प्रमाणे अकस्मित मयत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत कृष्णा भाऊ कालेकर हा दि. 03/08/2022 रोजी दुपारी 12 : 30 च्या सुमारास काले,
गावच्या हद्दीतील पवना नदीच्या पुलाच्या पुर्वेस अंदाजे 200 मीटर अंतरावर मयत कृष्णा हा जॉगींग करण्यासाठी गेला होता तो परत आला नाही नंतर त्याचा शोध घेत असताना त्याच्या अंगावर असलेले कपडे त्यावर शिवतेज गृप व कृष्णा नाव लिहिलेले भगवा , काळे व पांढरे रंगाचा टि शर्ट, अशी पवना नदीच्या पुला जवळ मिळुन आले त्या नंतर शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा यांच्या मदतीने मयत कृष्णा याचा शोध घेतला असता तो मयत अवस्थेत मिळुन आला आहे.

लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार विजय गाले हे करत आहेत.