पवना पोलिसांना पेट्रोलिंग साठी व्यावसायिकांकडून सुमो गाडीचे लोकार्पण राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न..

0
137

लोणावळा दि.२१: सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथे पवना कॅम्पिंग चालक/मालक यांची ख्रिसमस व ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याप्रमाणे टेंटचा व्यवसाय करताना योग्य त्या संबंधित विभागाच्या परवानग्या घेऊन व्यवसाय करावा, येणाऱ्या पर्यटकांची सर्व माहिती घेऊन त्याचे रजिस्टर अद्यावत करावे, त्यांचे ओळखपत्र घेण्यात याव्यात इत्यादी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

तसेच पवनानगर बीट करिता पोलीस स्टेशन व लोकसहभागातून पवनानगर चौकीला पेट्रोलिंग करिता सुमो गाडीचा लोकार्पण सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.