मावळ (प्रतिनिधी): पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. अशी मागणी मावळ भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.मावळातील मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मावळ दौऱ्यावर आले होते.
मावळ भाजपा च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा,मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत मावळ तालुक्यातील
नागरिकांच्या रहदारीसाठी सेवा रस्ते करावे. आदी मागण्यांचे निवेदन मावळ तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सायली बोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे ,ज्ञानेश्वर दळवी ,जितेंद्र बोत्रे ,एकनाथ टिळे , मोरेश्वर पडवळ,मुकुंद ठाकर ,दिलिप काळे , तानाजी शेंडगे आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करून मागणीचे निवेदन देण्यात आले.