Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळपवना विद्या मंदिरातील दिंडी सोहळ्याने पवना नगरी भारावली…

पवना विद्या मंदिरातील दिंडी सोहळ्याने पवना नगरी भारावली…

पवना (प्रतिनिधी): पवना विद्या मंदिर व लायन शांता मानेक पवना जुनिअर कॉलेज , कै . सौ . मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याने पवनानगरीला भक्तीमय आळंदीचे स्वरूप आले होते.
स्थानिक भाविकांनी या पाळखीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या . दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते . सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱ्यांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये शाळेतील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते . तर संत ज्ञानेश्वर , नामदेव , तुकाराम , मुक्ताबाई या संताच्या वेषभुषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती.
सकाळी आठ वाजता सांप्रदायिक क्षेत्रातील आखील भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष शांताराम महाराज बोडके , इको गोधामचे संस्थापक नितिन घोटकुले , माजी सभापती निकीताताई घोटकुले , सरपंच खंडु कालेकर , प्राचार्या अंजली दौंडे यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतीमचे व पालखी तसेच विना पुजन करण्यात आले.
यावेळी शांतारम बोडके महाराज बोलताना म्हणाले की , दिंडी सोहळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार होतात त्यामुळे संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्राचे कार्य व संताचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात होतात . त्यामुळे शालेय पातळीवर असे दिंडी सोहळ्यांची गरज आहे.
यावेळी माजी उपसरपंच अमित कुंभार , प्रविण घरदाळे , संदिप भुतडा , संजय मोहळ , ज्ञानेश्वर आडकर , शाळेच्या पर्यवेक्षिका निला केसकर , शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर , मुकूंद ठाकर , माऊली ठाकर , अरूण नायर , फुलाबाई कालेकर, जयश्री पवार , पोलिस पाटील सीमा यादव , आखील भारतीय वारकरी सांप्रदायाचे प्रसिध्दी प्रमुख सचिन ठाकर , काशिनाथ भोंडवे , गोरख घोजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते . दिंडी सोहळ्याचे प्रमुख गणेश ठोंबरे , संजय हुलावळे , राजकुमार वरघडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शाळेतुन निघाल्यानंतर पवनानगर पाटबंधारे वसाहत येथुन पवनानगर चौक , काले गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत नेण्यात आली.
दिंडीमध्ये भजन पथका बरोबरच लेझिम पथक , वृक्ष दिंडी , ग्रंथ दिंडी , पर्यावरण दिंडी यांनी सहभाग घेतला होता.या पथकांनी प्रत्येक चौकात प्रात्यक्षिके दाखवून नागरिकांची वाहावाह मिळविली. दिंडीचे हे 25 वे वर्ष असुन अनेक ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शिक्षक यांनी सांप्रदायिक खेळ खेळत फुगडी घातली . त्यामुळे पवनानगरला आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते . हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .महिलांनी जागोजागी पालखीची ओवाळणी करून पुजन केले.
पवनानगर व्यापारी मित्र मंडळ , मार्च 99 – 2000 बॅच , पाठबंधारे वसाहत व सामाजिक संस्थांनी विद्यार्थांना जागोजागी खाऊ व फराळाचे वाटप केले . काले ग्रामस्थांनी काले गावाच्या वेशीवर भजन मंडळ घेऊन येत पालखीचे उत्साहात स्वागत केले . काले येथील विट्ठल रूक्मिणी मंदिरात आरती घेऊन फराळाचे वाटप करत पालखीचा समारोप करण्यात आला.
दिंडी सोहळ्याचे आयोजन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे , प्राचार्या अंजली दौंडे , पर्यवेक्षिका निला केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे , संजय हुलावळे , राजकुमार वरघडे , पवना शिक्षण संकुलातील सर्व शैक्षणिक विभागाचे प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा – यांनी यशस्वी संपन्न केले.
- Advertisment -