मावळ (प्रतिनिधी):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संदीप सोनवणे यांची पवन मावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संदीप सोनवणे हे कोथुर्णे पवन मावळ येथील रहिवासी असून त्यांनी अनेक वर्ष नित्तांत समाज कार्य करून संपूर्ण मावळ तालुक्यात तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात.त्यांच्या नित्तांत समाज कार्याची दखल घेत.
भारतीय बौद्ध महासभा व जयंती महोत्वस कमिटी यांच्या वतीने त्यांची पवन मावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.