पाटण बोरज ग्रामपंचायत उपसरपंच पदी दत्तात्रय केदारी बिनविरोध…

0
42

मळवली : पाटण – बोरज ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी मावळ तालुका युवा सेना समन्वयक दत्तात्रय ज्ञानदेव केदारी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

पाटण – बोरज ग्रामपंचायतच्या उपसरपंच शालन शिळवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच प्रविण तिकोणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली होती.निर्धारीत वेळेत दत्तात्रय केदारी यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक नासीर पठाण यांनी दत्तात्रय केदारी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली .

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सरपंच प्रविण तिकोणे , मा . उपसरपंच शालन शिळवणे , मा . उपसरपंच संदिप तिकोणे , सदस्य दशरथ कदम , सदस्या सुनिता तिकोणे , मालती केदारी , प्रमिला कोंढभर , पंकज तिकोणे , अरुण तिकोणे , भागूजी केदारी , अनंता हुलावळे , ज्ञानेश्वर पडवळ , रुपेश पवार , विनायक हुलावळे , प्रशांत शेडगे , शिवराज दिघे , श्रीकांत तिकोणे , भरत साठे , विशाल तिकोणे , बंटी शिळवणे , गणेश तिकोणे , अंकुश तिकोणे , विशाल तिकोणे , श्रीकांत शिळवणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय केदारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.