पाटण येथील आदिवासी झोपडीला लागलेल्या आगीत आदिवासी कुटुंब उध्वस्त….

0
333

मळवली : मळवली पाटण येथे एका आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला आग लागून झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना दि.20 रोजी दुपारच्या वेळी घडली.

हातावर पोट असलेले कुटुंब उध्वस्त, परिसरात वनवा लागल्याने ही आग पसरत येत झोपडी जळून राख झाली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हे उघड्यावर आलेले आदिवासी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

लक्ष्मण सोनू वाघमारे असे घर जळून खाक झालेल्या आदिवाशाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लक्ष्मण वाघमारे व त्याचा परिवार सकाळी मजदुरी करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आहे. झोपडीतील भांडी, कपडे, अन्न धान्य तसेच त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ही सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने हे आदिवासी वाघमारे कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर आले आहे.

त्यासंदर्भात पाटण ग्रामपंचायतीने पंचनामा करून त्यासाठी पाठपुरावाही करत आहेत.तसेच या गरीब कुटुंबाची झोपडी पुन्हा उभी राहील का? याचा प्रपंच पुन्हा रुळावर येईल का? यासाठी शासनाने व आमदार शेळके यांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी पाटण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.