Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडपाणी पुरवठा विभागातील ठेकेदारी कामगार म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन मध्ये सामील !

पाणी पुरवठा विभागातील ठेकेदारी कामगार म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन मध्ये सामील !

कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणार कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदारी कामगार हे नुकतेच म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन मध्ये सामील होत सभासद झाले आहेत .हि युनियन हिंद मजदूर सभेशी संलग्न असून अध्यक्ष – ऍड सुरेश ठाकूर , कार्याध्यक्ष – संतोष पवार , सरचिटणीस – अनिल जाधव , तर कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे हे आहेत.

संपूर्ण कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांत ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कामगार हे सहा जण असून ते गेली चार ते पाच वर्षे कर्जत न.प.च्या पाणी पुरवठा विभागात काम करत आहेत . मात्र शासन नियमानुसार त्यांना वेतन मिळत नसल्याने आपले न्याय – हक्क मिळण्यासाठी त्यांनी या कामगार म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन चा आधार घेत सभासद झाले आहेत.

पाणी पुरवठा विभागातील ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे कायदेशीर न्याय – हक्क मिळवून देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून संघर्ष करू , असे मत म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे यांनी व्यक्त केले आहे . आज हे ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कामगार म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनमध्ये सामील होऊन सभासद झाले असून त्यांचे न्याय – हक्क मागण्यांचा निर्णय घेताना आमच्या युनियनच्या पदाधिकारी बरोबर चर्चा करूनच निर्णय घ्यावा , असे निवेदन आज कर्जत युनिट अध्यक्ष अरविंद मोरे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिले आहे.

You cannot copy content of this page