पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने अटक केलेल्या दरोदेखोरांकडून आठ गुन्हे उघड ,9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत !

0
55

पिंपरी चिंचवड : पोलीसांवर वार करून पळून गेलेल्या दरोदेखोरांना पिंपरी चिंचवड आयुक्तालायाच्या दरोडा विरोधी पथक , गुन्हे शाखा यांनी अवघ्या 48 तासात अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये , या उद्देशाने पेट्रोलिंग करून , दरोडा , चैन चोरी , जबरी चोरी , वाहन चोरी या गुन्ह्यास प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनानप्रमाणे दरोडा विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , पथकातील अधिकारी व अंमलदार आयुक्तालाय हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन करत होते.


पोलिस उप निरीक्षक मंगेश भांगे यांना त्यांच्या खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली , की चिंचवडमधील पडक्या हॉटेल बिस्ट्रॉच्या जागेत काही इसम एका सिल्वर रंगाच्या सेंट्रो कार क्रमांक MH 43 A 4755 यामध्ये संशयितरित्या फिरत आहेत व ते त्या परिसरातील रहिवासी नसून त्यांच्या हालचाली संशयास्पदb आहेत . या माहितीनुसार तांगडे व भांगे यांनी एक टीम तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या . या कारवाईत तीन इसम हे पोलीस असल्याची चाहूल लागताच गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन झाडीतून पळ काढला . उर्वरित 2 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले . करणसिंग दुधानी ( वय 25 वर्षे , रामटेकडी हडपसर ) व अनिल टाक ( वय 29 वर्षे , रा . ओटा स्कीम निगडी ) यांना या कारवाईत 6 जूनला रात्री 10.45 वा . ताब्यात घेण्यात आले .त्यांच्या अंगझडतीमध्ये एक बोर कटर , दोन स्क्रू ड्राइवर , एक कोयता , दोन लोखंडी कटावणी व एक सेंट्रो कार असे 2.03 लाख रुपये किंमतीचा माल मिळाला.

त्यांच्याकडे चौकशी करता ते घरफोडीसाठी हत्यारे घेऊन वाल्हेकरवाडी येथील पेट्रोल पंपवार दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात होते . त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम 399 , 402 ,हत्यार कायदा कलम 4 ( 25 ) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ह्या आरोपींची 15 जूनपर्यंत 9 दिवसांची पोलिस कोठडीची रिमांड घेऊन बारकाईने व सखोल चौकशी केली . आरोपी करण सिंग दुधानी व त्याचा साथीदार जितसिंग टाक या दोघांनी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गाडी पळवली.

त्यांचा पाठलाग दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व दोन अंमलदार करत असताना सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ त्यांनी पोलिसांना प्रतिकार करून गाडी सोडून पळाले . त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 307 , 353 , 332 , 504 , 506 , 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत व 2 सेंट्रो कार , 1 मारुती इको कार , सोन्याचे दागिने , 1 मोबाईल फोन , 1 पल्सर मोटरसायकल असा एकूण 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा माल पोलीस कस्टडी दरम्यान जप्त करण्यात आला आहे .