![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
आरपीआय पक्ष सत्तेत राहूनही सोई – सुविधांसाठी वंचित…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ४ इंचाची पाण्याची पाईप लाईन टाकून अर्धवट अवस्थेत पडली आहे , हि पाईप लाईन शेवटपर्यंत नेली नसल्याने पाण्याची टंचाई जाणवत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण असून तर गुरवआळी येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून या महत्त्वाच्या गंभीर समस्यांकडे कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाच्या बरोबरच सत्ताधारी शिवसेना भाजपा व आरपीआय लोकप्रतिनिधी तसेच विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आरपीआय ( आठवले ) पक्षाचे कर्जत शहर सचिव सुनिल मालू सोनावणे व कर्जत शहर युवक अध्यक्ष राहुल रघुनाथ गायकवाड यांनी या पालिकेच्या बेजबाबदारपणा विरोधात दंड थोपटले असून वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या विरोधात दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी संविधान चौक – दहिवली , मराठी शाळेजवळ आमरण उपोषणास बसण्याचा ईशारा दिल्याने आरपीआय पक्ष पालिकेत सत्तेत असूनही उपोषणाचा मार्ग पत्करणार असल्याने शहरात याची चर्चा होऊ लागली आहे.
दहिवली प्रभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बौद्ध वस्तीतील व शेजारीच असणाऱ्या गुरव आळीसाठी पिण्याच्या पाण्याची ४ इंच व्यासाची पाईप लाईन नागरिकांच्या तक्रारीवरून टाकली आहे , मात्र हे काम ” हुश्यार ” पालिका प्रशासनाच्या पाणी विभागाने अर्धवट टाकून त्यातच हि पाईप लाईन चालू केली नाही , त्यामुळे या केलेल्या कामाचा फायदा कुणालाच सहा महिन्यापासून होत नाही.अश्या गलथान कारभारामुळे परिसरात पाण्याची टंचाई भासत आहे . येथील रहिवासी वर्गाने वारंवार पालिकेत अर्ज , तोंडी सांगूनही प्रशासन व सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याने महिला वर्गात लोकप्रतिनिधींबाबत संताप खदखदत आहे.
तसेच या दोन्ही परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या शौचालयाची देखील दयनीय अवस्था झाली आहे , स्लॅब फुटला असल्याने ते कधी खाली पडेल , व जीवितहानी होईल , हे सांगता येत नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे , लाईट कनेक्शनच्या वायरी निघाल्या आहेत , त्यामुळे रात्रीचे लाईट अभावी शौचालयात जाणे , मोठ्या जिकरीचे व महिलांना जोखमीचे आहे .
चेंबर देखील खराब व जाम होऊन घाणीत शौचालयास कसे बसावे , हा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे , शौचालयाची गटारे व टाकी फुटून घाण बाहेर दिसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे , त्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम होत असून यावर मार्ग काढावा , शौचालय दुरुस्त करावे , हे वारंवार सांगूनही व लेखी तक्रारी करूनही कोणीच लक्ष देत नसल्याने अखेर ” सत्तेत ” असलेल्या आरपीआय पक्षाचे शहर सचिव सुनिल सोनावणे व कर्जत शहर युवक अध्यक्ष राहुल गायकवाड यांना उपोषणाचा मार्ग धरावा लागला असून दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पालिकेच्या प्रशासनाला व सत्ताधारी पक्षांना समस्यांची गंभीरता लक्षात आणून देण्यासाठी तसेच विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी यांना झोपेतून जागे करण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
विशेष म्हणजे सन २०२१ – २२ मध्ये संपूर्ण कर्जत शहरातील शौचालयांची दुरुस्ती , रंगरंगोटी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कामे केलेली असताना हेच शौचालय असे का ठेवले , या प्रश्नाचे उत्तर सापडत नसून नवीन स्लॅब , स्लॅबवर पत्र्याची शेड , पाणी साठवणसाठी पाण्याची टाकी बांधणे , लाईटची सर्व कामे , संडासाची टाकी नवीन बांधणे , पेव्हर ब्लॉक लादी टाकणे , शौचालयास नवीन चेंबर टाकणे , रंगरंगोटी करणे आदी कामे बाकी असून पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची मागणी दहिवली बौद्ध नगर व गुरव आळी रहिवासी वर्गाने केली आहे.