पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर शासनाचे निर्बंध…

0
204

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

 महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच पर्यटन स्थळांवरही राज्य सरकारने बंदी आणली आहे.


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. पर्यटन स्थळांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाला असून गर्दी आढळल्यास पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.मंगळवार पासून पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

त्यानुसार मावळ तालुक्यामधील लोणावळा परिसरातील भूशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलींग पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण या ठिकाणी पर्यटकांना बंदी असणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना प्रशासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत या पर्यटनस्थळांवरती जाण्यास बंदी असणार आहे.