पुणे लोणावळा पुणे लोकल मध्ये तीनची वाढ…11 एप्रिल पासून होणार संचालन !

0
520

पुणे – लोणावळा लोकल फेऱ्यांमध्ये आणखी तीन फेऱ्यांची भर , प्रवाशांना मोठा फायदा होणार पुणे : पुणे – लोणावळा लोकल फेऱ्यांमध्ये आणखी तीन फेऱ्यांची भर पडली आहे . पुणे – लोणावळा विभागाने 3 लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे . यापूर्वी पुणे ते लोणावळा दरम्यान 20 अप – डाऊन फेऱ्या सुरू असून आणखी ३ लोकलच्या 6 अप – डाऊन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत . नव्याने सुरु केलेल्या लोकलचे 11 एप्रिल पासून संचालन सुरु होणार आहे . रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे . नव्याने सुरु करण्यात आलेल्या पुणे – लोणावळा लोकल व वेळ पुढील प्रमाणे असणार आहे.

पुणे ते लोणावळा विशेष लोकल : क्रमांक 01564 पुण्याहून 11:17 वाजता सुटेल आणि 12:37 वाजता लोणावळ्यात पोहचेल . तर विशेष लोकल क्रमांक 01564 लोणावळा येथून 15:30 वाजता सुटेल आणि पुणे येथे 17:05 वाजता पोहचेल .

पुणे ते लोणावळा विशेष लोकल : क्रमांक 01570 पुण्याहून 17:15 वाजता सुटेल आणि 18:38 वाजता लोणावळ्यात पोहचेल . तर विशेष लोकल क्रमांक 01569 लोणावळा येथून 19:00 वाजता सुटेल आणि शिवाजीनगर येथे 20:25 वाजता पोहचेल .

शिवाजीनगर ते लोणावळा विशेष लोकल : क्रमांक 01578 शिवाजीनगर येथून 20:35 वाजता सुटेल आणि 21:50 वाजता लोणावळ्यात पोहचेल . तर विशेष लोकल क्रमांक 01577 लोणावळा येथून 22:05 वाजता सुटेल आणि शिवाजीनगर येथे 23:25 वाजता पोहचेल.