पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ” या चौकास नामफलक लावण्यास कर्जत नगर परिषदेला पडला विसर !

0
406

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत नगर परिषदेने शहरात सर्व रस्त्यांना व चौकास ठराव घेऊन महापुरुषांचे , संतांचे , समाज सुधारकांचे , त्याचप्रमाणे बहुजन समाजासाठी अलौकिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांची नावे रस्त्यांना नुकतीच दिलेली आहेत .त्यानुसार तसे फलक लावले गेले असताना मात्र २०१८ साली ठराव होऊनही जुने एस. टी . स्टँड परिसरातील गुंडगे रोड येथे असणाऱ्या चौकास ” पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ” असे नामफलक लावले नसल्याने , कर्जत नगर परिषद जाणूनबुजून पाटी लावण्यास विसर करत नाही ना ? असा सवाल उठला असून यामुळे पालिकेच्या या भूमिकेचा या परिसरात संताप खदखदत आहे.

तर या विरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी महापुरुषांची पाटी लावण्यास कर्जत नगर परिषद दुजाभाव करत असल्याने त्वरित नामफलक पाटी लावावी , अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.कर्जत नगर परिषदेच्या दि . २० डिसेंबर २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १४ मध्ये झालेल्या विषयांवर चर्चेत नगरसेविका सौ . पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांच्या मागणी पत्रानुसार त्यावेळी सभागृहात चर्चा करण्यात आली होती , त्यानुसार या रस्त्यावरून माऊली पालखी सोहळा हा सालाबादप्रमाणे नागरिक उत्साहात साजरा करत असतात.

पालखीचा मार्गक्रमण याच रस्त्याने होत असल्याने या रस्त्यास ” माऊली पालखी मार्ग ” असे नाव देणेस , तसेच जुन्या एस . टी . स्टँड ( गुंडगे रोड ) या चौकास ” पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ” असे नामकरण करण्यास महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १८५ नुसार कार्यवाही करणेस हि सभा या ठरावानुसार प्रशासकीय मंजुरी देत आहे , ठराव सर्वानुमते मंजूर असून सूचक – सौ . पुष्पा हरिश्चंद्र दगडे व अनुमोदक – सौ . यमुताई बाळाजी विचारे असे नमूद केले आहे. दिनांक ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती दिनी त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने नामफलक बसवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून बहुजन समाजामध्ये प्रशासनाबद्दल आदर व प्रेम निर्माण झाला असता.

याबाबतीत त्यावेळच्या नगरसेविका व आताच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेऊन यांत लक्ष घातल्यास बहुजन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा नामफलक नक्कीच येथे लागेल व विसरलेल्या पालिका प्रशासनाने स्थानिक राजकीय घडामोडीत लक्ष न देता झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे गरजेचे असून मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी हि कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी अखिल भारतीय खाटीक समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस
सुजित मधुकर धनगर यांनी केली आहे .