Wednesday, October 16, 2024
Homeपुणेलोणावळापुरस्काराचे सातत्य राखत " माझी वसुंधरा अभियान 4.0" मध्ये लोणावळा नगरपरिषदेची पुरस्काराची...

पुरस्काराचे सातत्य राखत ” माझी वसुंधरा अभियान 4.0″ मध्ये लोणावळा नगरपरिषदेची पुरस्काराची हॅट्रिक..

लोणावळा : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मा.पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा मार्फत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये लोणावळा नगरपरिषदेने सातत्य राखत 1) भूमी थिमॅटिक क्षेत्र क्रमांक – 01(प्रथम) – बक्षीस रक्कम १.५ कोटी, 2) राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक – 02 (द्वितीय) बक्षीस रक्कम १.५ कोटी, 3)राज्यस्तरीय क्रमांक – 05(पाचवा) असे एकूण बक्षीस रक्कम तीन कोटी रुपये असे बक्षीस प्राप्त केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे यांनी या यशात सर्व लोणावळेकर नागरिक, सर्व मा.पदाधिकारी, सर्व सामजिक सेवाभावी संस्था, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, सर्व असोसिएशन, पत्रकार, महिला बचत गट, लोणावळा नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असून सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page