पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्याकडून वरसोली टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची कान उघडणी…

0
870

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी वरसोली टोल नाका येथील कामगारांना गणवेशा शिवाय ड्युटी करण्यासंदर्भात दिले धडे.

धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मावळातील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध चेकपोस्ट वर पाहणी करत असताना. वरसोली टोल नाका येथील आय आर बी कंपनीने ठेकेदारी दिलेले कर्मचारी गणवेश व ओळखपत्र नसताना कार्य बजावत असल्याचे निदर्शनास आले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक यांनी सध्या टोल नाक्यावर वाढणारी वाहनांची गर्दी व या पूर्वीचे टोल कर्मचारी व पर्यटकांमधील वाद विवाद लक्षात घेता आय आर बी टोल कर्मचारी जे बिना गणवेश कार्य करत होते त्यांना बाहेर घेऊन गणवेशा शिवाय ड्युटीवर येऊ नये अशी बजावणी केली तसेच त्यासाठी आय आर बी प्रशासनाचे काही अधिकारी बोलवून त्यांना ही या बाबत खडसावले.

होळी सणानिमित्त मावळातील कार्ला,एकविरा,पवना नगर, मळवली, भाजे इत्यादी पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा वाढता कल पाहता कायदा सुव्यवस्थेला काही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत असताना पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी वरसोली टोल नाका येथे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये होणाऱ्या गैरसमजामुळे होणारे वाद व भांडण होऊ नये यासाठी यांना बजावणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.