Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष दशरथ मुने यांची " शिवसेना सहकार...

पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष दशरथ मुने यांची ” शिवसेना सहकार सेनेच्या कर्जत तालुका प्रमुख ” पदी निवड !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने , धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मा . एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते आज शिवतीर्थ पोसरी येथे पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत – खालापूर तालुक्यातील गोर गरीब , अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय देणारे , पर्यायी उपोषण करून आपल्या जीवाची बाजी लावून तालुक्यातील समस्यांना वाचा फोडणारे डॅशिंग नेतृत्व दशरथ मुने त्यांना ” शिवसेना सहकार सेनेच्या कर्जत तालुका प्रमुख ” पदी नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दशरथ मुने हे कर्जत तालुक्यातील बारणे येथील रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत . आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील शेती करून तालुक्यातील शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत . राजनाला प्रकरण , भात खरेदी विक्री , शेतकऱ्यांना बी – बियाणे मिळणे , अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना झालेल्या शेतीच्या नुकसानीत भरपाई मिळण्यासाठी केलेले प्रयत्न , राजनाला दुरुस्ती कामांत निकृष्ठ दर्जेबाबत उठविलेला आवाज , विजेच्या समस्येबाबत , इतर न्याय हक्कासाठी तालुक्यातील सर्वाधिक गाजलेले उपोषणे , अन्याय अत्याचाराविरोधात व परिसरातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना दिलेली साथ , आरोग्य व्यवस्थेतून मिळणाऱ्या सोई – सुविधेसाठी सर्वांसाठी झटत रहाणे , पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा , पत्रकार बंधू , व गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करण्यासाठी केलेली मदत , या सर्व क्षेत्रात त्यांची कार्य करण्याची असलेली धडपडीमुळे सर्वच शासकीय , खाजगी , व अन्य संघटन क्षेत्रात त्यांचा आदराने दबदबा आहे.
त्यांची शिवसेना सहकार सेनेच्या कर्जत ता.प्रमुख पदी केलेली वर्णी शिवसेना पक्षासाठी भविष्यात खूपच फायदेशीर ठरेल .यावेळी सहकार क्षेत्रात तसेच शेतकरी बांधवांच्या समस्या , अडचणी व विविध प्रश्न या मुख्य पदावर राहून अहोरात्र सोडविण , व या पदाला न्याय देईन , असे नवनिर्वाचित सहकार सेना कर्जत ता.प्रमुख दशरथ मुने यांनी मत मांडले.यावेळी शिवसेना सहकार सेनेच्या ध्येय धोरणानुसार आपण यशस्वी वाटचाल कराल , अश्या शुभेच्छा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी नवनिर्वाचित शिवसेना सहकार सेनेचे कर्जत तालुका प्रमुख दशरथ मुने यांना दिल्या.
याप्रसंगी शिवतीर्थ या जनसंपर्क कार्यालयात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , कर्जत तालुका संघटक संतोषशेठ भोईर , कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे , युवा नेते साईनाथ मुने , ऍड.अजित पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

You cannot copy content of this page