Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांचे " आमरण उपोषण...

पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांचे ” आमरण उपोषण ” तात्पुरते स्थगित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघात नदीच्या पात्रात मुंबईच्या धन दांडग्यांनी बेकायदेशीर बांधकामामुळे येथील शेजारी वसलेल्या गावातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा धोका ओळखून १ वर्षांपूर्वी केलेल्या उपोषणाला दिलेले आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाने न पाळल्यामुळे पुन्हा एकदा शासनाला जाग येण्यासाठी शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी उपोषण स्थळी भेट देवून यशस्वी मार्ग काढल्याने हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले . यावेळी माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गुंटूरकर , कर्जत नायब तहसीलदार बाचकर यांनी उपस्थिती दर्शवून रमेश दादा कदम यांची मागणी मान्य करून सरबत पाजले.

यावेळी प्रांत अधिकारी व संबंधित अधिकारी वर्ग यांची समिक्षा बैठक घेवून सदरची नदी पात्रातील बेकायदेशीर बांधकामे धोकादायक लाल रेषेच्या आत आहेत की बाहेर ? त्यांचे सर्व्हे , संबंधित मालकांच्या जागेची कागदपत्रे तपासून समिक्षा बैठक मा. प्रांत अधिकारी यांच्या दालनात लावून बेकायदेशीर बांधकामे सिद्ध झाल्यावर त्वरित हटविण्यात यावीत , अशी सूचना राजिपाचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी मांडली असता , ती पाटबंधारे उप अभियंता गुंटूरकर व नायब तहसिलदार बाचकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून मागणी मान्य केली असता , उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी यांस दुजोरा देवून सदरचे आमरण उपोषणाला स्थगिती देत , सोमवार पासून हि समिक्षा बैठक पार पडून ठोस निर्णय घेत नाहीत तोवर पाटबंधारे कार्यालय कर्जत आवारात ठिय्या आंदोलन सुरू राहणार , असे मत व्यक्त करून सरबत पिवून आमरण उपोषण स्थगित केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page