Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष " रमेश दादा कदम मैदानात ",कर्जतमध्ये आमरण...

पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम मैदानात “,कर्जतमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रायगड जिल्ह्यासहित कर्जत तालुक्यातील शासकीय अधिकारी हे न्याय हक्कासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याना उपोषण सोडते प्रसंगी जे लेखी आश्वासन दिले जाते , त्या आश्वासनाला बगल देत ती मागणी कित्येक महिने पूर्ण केली जात नाही . उपोषणकर्ते संबंधित अधिकारी वर्गाच्या कार्यालयात खेटे मारून वैतागतो , पण त्याची मागणी हे ” गेंड्याची कातडी ” पांघरून काम करणारी यंत्रणा पूर्ण करत नाहीत , पुन्हा त्याला आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतो , अशीच एक घटना कर्जतमध्ये घडली असून पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांना रायगड पाटबंधारे विभाग , कोलाड ता. रोहा येथील कार्यकारी अभियंता इंजि. दिनेश्री राजभोज यांनी एक वर्षापूर्वी आश्वासन पत्र देवून त्यांचे उपोषण सोडविले होते.
एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला पत्र लिहून कळवतो , कारवाई करा , मात्र प्रत्येक्षात कुठलेच पाऊल उचलायचे नाही , असे षडयंत्र रचून उपोषण कर्त्याला ” उल्लू ” बनवायचे काम बिनबोभाट करत असतात . अश्या फसव्या ” जिल्हाधिकारी ” वर्गासहित कर्जत तालुक्यातील अधिकारी वर्गाच्या ” मुसक्या आवळण्यासाठी ” पुन्हा एकदा आज शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी कर्जत लोकमान्य टिळक चौकात ” आमरण उपोषणाला ” सुरुवात केली आहे.

कर्जत तालुक्यात उल्हास नदी , पेज नदी व इतर नदीच्या पात्रात तसेच नैसर्गिक नाले , कालवे यांत मुंबईच्या धन दांडग्यांनी बेकायदेशीररित्या नागरिकांच्या जीविताला धोका होईल , अशी बेकायदेशीर कामे केली आहेत . याविरोधात पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी गेल्या वर्षी २० फेब्रुवारी २०२३ रोजी आमरण उपोषण करून याविरोधात आवाज उठवला होता.
मात्र खोटी आश्वासने देवून हे जिल्ह्यातील व कर्जत पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी उपोषण मोडीत काढून अक्षरशः ” उल्लू ” बनविण्याचे धंदे केले होते . जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना बेकायदेशीर नदीतील अतिक्रमणे असलेली यादी पाठवून कारवाई करा , असे रोहा – कोलाड चे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी कळवून उपोषणकर्त्यांची दिशाभूल केली होती . यांत कर्जत तालुक्यातील सांगवी येथील अब्बास शेख , देवाशिव चक्रवर्ती – खांडपे , राजू ओसवाल – मालवाडी , रिव्हर गेट रिसॉर्ट – नसरापूर , सुभाष लालजी जैसवाल – भालीवडी अशी एकूण ५ तर नव्याने रजपे , आडिवली येथील नदीत बेकायदेशीर बांधकामे झालेले तसेच खालापूर तालुक्यात १३ बेकायदेशीर बांधकामांची प्रकरणे आहेत . या कामांना ” राजकीय वरदहस्त ” असल्याने , शासकीय अधिकारी वर्ग ” नांगी ” टाकून गुमान गप्प असल्याची चर्चा असल्याने याविरोधात पुन्हा एकदा पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी दंड थोपटले असून आता मात्र आर पार ची लढाई लढणार , असून या शासकीय अधिकारी वर्गांचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणणार , अशी भूमिका रमेश दादा कदम यांची आहे.

या आमरण उपोषणाची दखल संबंधित शासकीय अधिकारी यांनी दि .१२ मार्च २०२४ पर्यंत न घेतल्यास नंतर कोणत्याही क्षणी ” आत्मत्याग ” करणार असून याची सर्व जबाबदारी या ” बुजगावणे ” अधिकारी वर्गाची असेल , असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे . पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सघंटनेच्या वतीने आजपर्यंत गरीब – अन्यायग्रस्थ नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्ता पर्यंत २१ वेळा आमरण उपोषण केले असून हे २२ वे आमरण उपोषण प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांचे असल्याने शासकीय अधिकारी वर्गाची या ” मुस्कटदाबी ” आमरण उपोषणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे . यावेळी उपोषण स्थळी पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी, प्रदेश अध्यक्ष – सुनिलभाऊ पाटील, शांताराम दामु नरवडे – उपाध्यक्ष पश्चीम महाराष्ट्र, हरिश्चन्द्र देवकर – कोकण प्रदेश महासचिव , बाळु डायरे – ओबीसी तालुका अध्यक्ष कर्जत, रामदास फावडे, भागाजी लोभी , राजाभाऊ कुलकर्णी , सुरेश बोराडे , प्रमिला बोराडे , प्रमोद पाटील , सदाशिव‌ कदम‌ , यश कदम , सुरेश सोनावणे , महेंद्र भोईर , दिलीप पाटील , दिनेश भरकले , महादेव भोईर , मा . नगरसेवक बळवंत घुमरे , त्याचप्रमाणे अनेकांनी भेटी दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page