प्राणाची आहुती देणारे ” हुतात्मा हिराजी पाटील ” यांचे नाव फलकावर लिहिण्याचा अधिका-यांना विसर !

0
115

तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर शेळके यांचा ईशारा !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य काळातील कुठलाही इतिहास माहीत नसलेल्या एम एस आर डि सी च्या अधिकारी वर्गाला त्याची माहिती घेऊनच काम करण्याचे असताना स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मा झालेले हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या पराक्रमाने पावन झालेली हि भूमी असताना कर्जत मुरबाड रोड वरील  कळंब – पोही येथील M.S.R.D.C. ने लावलेल्या शासकीय फळकावर या ” हुतात्मा हिराजी पाटील ” यांचे मानिवली या गावी स्मारकाकडे जाणारा मार्ग असा उल्लेख करण्याच्या ऐवजी खाजगी मालमत्ता असलेल्या एका फार्महाऊस चे नाव टाकून येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्याने ” डोक्यात भुस्सा ” भरलेल्या या एम एस आर डी सी च्या अधिकारी वर्गांनी माहिती घेऊनच अश्या शासकीय पाट्या लावाव्यात , व त्वरित ” हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील ” यांचे नाव लावावे,अन्यथा आपल्या या देश विरोधी कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

असा संतापजनक क्रोध ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागरभाऊ शेळके यांनी दिला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्या मध्ये ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली , इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या आपल्या निधड्या छातीवर घेतल्या,असे “हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या  मूळ गावी “मानिवली “येथे कर्जत तालुक्याची अस्मिता असणारे हुतात्मा हिराजी पाटील स्मारक हे नेरळ कळंब रोड वर असून,सदर कळंब पोही रोड वर लावण्यात आलेल्या शासकीय सूचना बोर्डा वर खाजगी फार्महाऊस असलेले सगुणा बाग हे नाव आहे.

त्या ठिकाणी  “हुतात्मा हिराजी पाटील स्मारका कडे “हे नाव येणाऱ्या वीस दिवसा मध्ये बदलले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा ईशारा युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी एम एस आर डी सी चे मुख्य अभियंता यांना दिला आहे.तर या निवेदनाची प्रत मा. अदिती ताई तटकरे -पालकमंत्री -रायगड , मा .सुरेशभाऊ लाड -माजी आमदार – कर्जत , तहसीलदार – कर्जत , उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत व पोलीस निरीक्षक – नेरळ पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत , व अश्या चुकीच्या शासकीय पाट्या लावणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त केला आहे .