Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळप्रेम संबंधामुळे एका 22 वर्षीय विध्यार्थ्याला दगडाने मारहाण, नवलाख उंब्रे येथील घटना…

प्रेम संबंधामुळे एका 22 वर्षीय विध्यार्थ्याला दगडाने मारहाण, नवलाख उंब्रे येथील घटना…

मावळ (प्रतिनिधी) : नवलाख उंब्रे येथे प्रेम संबंधामुळे 22 वर्षीय विद्यार्थ्याला दगडाने मारहाण केल्याची घटना सोमवार दि. 9 रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंब्रे ता. मावळ येथे घडली.
प्रतिक सुरेश बावणे (वय 22, रा. देहुरोड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन सुरेश शेलार (वय 27, रा. गोखलेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे येथे प्रेम संबंधातून आरोपी सुरेश याने फिर्यादी प्रतिक याला लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page