Friday, December 8, 2023
Homeपुणेलोणावळाफिरोज बागवान यांची लोणावळा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवड…

फिरोज बागवान यांची लोणावळा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवड…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी फिरोज बागवान यांची निवड जाहीर करण्यात आली.
लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी बागवान यांना आज निवडीचे पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, लोणावळा काँग्रेसचे निरिक्षक मा. नगरसेवक नासिर भाई शेख, सेवादल महाराष्ट्र प्रदेशचे बाबूभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, ज्येष्ठ नेते सुबोध खंडेलवाल, अब्बास खान, जाकिर शेख, संजय तळेकर आदी उपस्थित होते.
लोणावळा शहरातील युवकांचे संघटन करत पक्ष वाढीसाठी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक अध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हा अध्यक्ष मा. आमदार संजय जगताप, मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरात पक्ष संघटना वाढवत पक्षाचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
- Advertisment -

You cannot copy content of this page