बहुचर्चित भिसेगाव चारफाटा ते बिकानेर रस्त्याची मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी केली पाहणी !

0
32

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव चारफाटा ते बिकानेर या रस्त्यातील बेकायदेशीर व अनधिकृत दुकान बांधकामांमुळे चर्चेत आलेल्या रस्ता रुंदीकरण कामांचे अनधिकृत बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग व कर्जत नगर परिषद यांच्या संयुक्त कारवाईने हटविल्याने ते काम पहाण्यास कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी अधिकारी वर्गासह पाहणी केली.चारफाटा ते बिकानेर या भिसेगाव रस्त्यावर अनेक बेकायदेशीर बांधकाम करून दुकाने थाटली होती.

यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन चारफाटा चक्का जाम होत होता. याविरोधात नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण केले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व कर्जत नगर परिषदेच्या संयुक्त माध्यमातून यावर पोलीस बंदोबस्तात जवळपास १०० दुकान धारकांवर कारवाई करून हे अतिक्रमण हटविण्यात आले होते.

या हटविलेले अतिक्रमण पहाण्यास व पुढील काम सुरळीत होण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी पाहणी केली व भविष्यात हे काम योग्य होऊन अधिक वेगाने होणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या समवेत शहर अभियंता मनीष गायकवाड , नगर रचना अभियंता माने , बाळा निकाळजे , माजी नगरसेवक बाळाजी विचारे , आणि इतर कर्मचारी उपस्थित होते .