if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
” संविधान के सन्मान में – बी एस पी मैदान में “
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम बहुजन वर्गाला ” संविधानाच्या ” माध्यमातून हजारो अधिकार बहाल केले , मात्र संविधान जरी महान असेल तरी ते ” राबविणारे हात ” आजपर्यंत संसद भवनात भांडवलदार व प्रस्थापितांचे असल्याने अधिकारापासून वंचित असलेला वर्ग नेहमीच याविरोधात आजपर्यंत लढाई लढत आहे . बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशिरामजी या प्रमुख बाबींचा सखोल अभ्यास करून बहुजन वर्गाकडे संसद भवनात जाण्यास पुरेसे खर्चिक बळ नसल्याने मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन वर्गाला निवडणुकीत ” वोट भी दो , ऑर नोट भी दो ” , असे आवाहन केले होते , याच त्यांच्या विचारांचे मी देखील सूत्र हाती घेवून मावळ लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या ” सुप्रिमो बहेन मायावतींजी ” यांना पंतप्रधान म्हणून होण्यासाठी अधिकृत उमेदवारी घेवून निवडणुकीस सामोरा जात असून मला देखील आपण ” वोट भी दो ऑर नोट भी दो ” , असे आवाहन बी एस पी चे उमेदवार राजाराम पाटील यांनी केले आहे.
राजाराम पाटील हे उरण विधानसभा मतदार संघात केगाव येथे रहात असून ते आगरी समाजाचे आहेत . पेशाने ते रिटायर्ड शिक्षक असून शेतकरी व मच्छीमार आहेत . शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून त्यांनी शेतकरी प्रबोधिनी मार्फत २००५ साली कोकणात कुळ कायद्याचे आंदोलन यशस्वी केले . तर कोकणात प्रदूषणकारी कोळसा प्रकल्पा विरोधात यशस्वी लढा दिला , कोकणात पर्यावरण वाचविण्यात देखील त्यांच्या लढ्याला यश आले होते . नवी मुंबईकरांच्या सिडको एम आय डी सी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे . सेझ विरोधी आंदोलनात ऍड. दत्ता पाटील यांच्या बरोबर सहभाग होता . सिडको साडेबारा टक्के आंदोलनात ते लोकनेते ऍड. दि. बा. पाटील यांच्या बरोबर राहून लढा दिला होता . ओबीसी चळवळीचे ते आजही नेतृत्व करत आहेत . केरूमाता लेणी वाचविण्याच्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले आहे.
नवी मुंबई विमानतळ आंदोलनात प्रकल्पग्रस्त आगरी – कोळी – कराडी – भंडारी – एस.सी. – एस. टी. यांच्या न्याय हक्कासाठी ते लढले आहेत , गावठाण हक्क लढा मुंबई सह ठाणे , रायगड , पालघर , नवी मुंबई , महाराष्ट्राचे नेतृत्व करून तो लढा त्यांनी यशस्वी केला आहे . गावठाण सिमांकन योजनेस विधानसभेत शासनाकडून मान्यता मिळविण्यास त्यांना यश आले आहे , कूळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अलिबाग विधानसभा त्यांनी लढविली आहे , सन २०१९ साली मावळ मधून लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना ७६००० हजार विक्रमी मते मिळाली होती . असंविधानिक उच्च वर्णीय मराठा आरक्षण विरोधासाठी महाराष्ट्रात संविधानिक ओबीसी आरक्षण बचावाची धाडसी भूमिका त्यांनी घेतली होती , लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलनाची वैचारिक भूमिका मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
सन २००५ सालापासून फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे .यासाठीच ” बहुजन समाजाचा मसिंहा , आपल्या हक्काचा माणूस ” म्हणून भांडवलदार व प्रस्थापितांच्या विरोधात लढाऊ नेतृत्व असलेले , बहुजन समाजाला संसदेत न्याय – हक्क देण्यासाठी लढाई लढणारे , बहुजन समाज पार्टीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार राजाराम पाटील यांनी मत देण्याच्या मशीनवर १ नंबर वर असलेले ” हत्ती ” या निशाणी वर मत देवून बहुमताने निवडून द्या , असे आवाहन समस्त बी एस पी कार्यकर्ते , छत्रपती – फुले – शाहू आंबेडकरी विचारांना मानणारे , शेतकरी – कष्टकरी – मच्छीमार आगरी समाज बांधवांना व मतदार बंधू भगिनींना केले आहे.