प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील करंबेळी ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपट्टी हे गाव गेल्या 20 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे, या ठिकाणी पावसाळ्यात मोठं मोठया दरडी पडत असून येथील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहेत.
हे गाव गेल्या 20 वर्षांपासून पुनवर्सनाच्या प्रतीक्षेत असून यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनविकर यांनी आक्रमक पवित्रा घेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची दिनांक ३०/०९/२०२१ रोजी, बाबदेवपट्टीतील ग्रामस्थांसह भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन येत्या 20 आक्टोबर पर्यंत या गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेस सुरूवात करावी. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संतोष ढवळे धनवीकर यांनी दिला आहे.
तर या निवेदनात कडापूर ते धनवी मार्गे जोर रस्ता आणि खर्डी खुर्द ते हुंबरी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणीही राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख- संतोष ढवळे धनविकर यांनी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सोबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्या पुष्पाताई ढवळे , माणगाव तालूका अध्यक्ष रविंद्र सुतार , माणगाव तालूका आल्पसंख्यांक अध्यक्ष सिकंदरभाई येस्वीकर, बाळारादादा ढवळे ,चंद्रकांतदादा झोरे, किरणशेठ ढवळे , पिंटेशशेठ कोकरे, कुंभे ग्रा पं सदस्य व रा. स. प नेते अंकुशशेठ झोरे, संदीप झोरे, गणेश गोरे, प्रकाश झोरे, उपस्थित होते.