Sunday, December 8, 2024
Homeपुणेतळेगावबापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

प्रतिनिधी : श्रावणी कामत

तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आज, बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण महाराष्ट्रात आज विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होत असून, बापूसाहेब भेगडे यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदार कर्तव्य पार पाडत लोकशाही बळकट करण्याचे उदाहरण साकारले.

विशेष म्हणजे, भेगडे यांच्या मुलीचे आज पहिलेच मतदान होते, आणि तिच्या वडिलांसाठी मतदान करण्याचा अनुभव तिच्यासाठी खास ठरला. या प्रसंगी तिने तरुण वर्गाला मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “तरुणांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून घराबाहेर पडावे आणि मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजवावा,” असा सकारात्मक संदेश तिने दिला.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बापूसाहेब भेगडे यांनीही लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या मताने देशाच्या भवितव्याचा निर्धार होतो,” असे ते म्हणाले.
मावळ मतदारसंघात मतदान उत्साहात सुरू मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरांतील मतदार आपला हक्क बजावत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page