Saturday, December 7, 2024
Homeपुणेतळेगावबेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगावात युवकाला अटक…

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगावात युवकाला अटक…

तळेगाव : बेकायदा आणि विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. शुक्रवार (दि.15 नोव्हेंबर) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव दाभाडे हद्दीतील हॉटेल मिनाक्षी समोर ही कारवाई करण्यात आली.
आकाश गणेश चव्हाण (वय 24 वर्षे रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे पिस्तूलासह अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधाकर विश्वनाथ केंद्रे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी आकाश चव्हाण याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) व महा.पो.का. क. 37 (1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारखेस व वेळी संबंधित आरोपी त्याच्या ताब्यात बेकायदा बिनापरवाना 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्टल बाळगले असताना मिळून आला.प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार कदम हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page