बेकायदेशीर उत्तखणन केल्याप्रकरणी चक्क ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल..

0
542

वडगाव मावळ : वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मळवंडी ठुले येथील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर उत्तणन करून जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे तलावात मातीचा भराव टाकून अतिक्रमण केल्या प्रकरणी आरोपी कृषिकेश साने सह मळवंडी ठुले ग्रामपंचायतचे पदाधिकारी व पोकलॅन्ड चालक, मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव मावळ हद्दीतील मळवंडी ठुले ता.मावळ जि. पुणे येथील महाराश्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे तलावामध्ये शासकीय मिळकतीपैकी जमीन गट नं- 470 ते 479 मध्ये मळवंडी ठुले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी बेकायदेशीररित्या पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने विहिरीचे अवैधरित्या उत्खणन करून , ऋशिकेश साने (रा.मळवंडी ठुले, ता. मावळ, जि.पुणे) याने बेकायदेशीर उत्खणनातील मुरूम व मातीचा भराव तलावाच्या मृतजल साठयामध्ये टाकुन आमच्या विभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले,व पाणीसाठा नष्ट करून , तलावाची क्षमता कमी केली आहे.

अशी फिर्याद जलसंपदा पुणे विभागाचे मुकादम यशवंत गुलाब खंडाळे ( वय 53,रा. इरिगेशन कॉलनी, दशभूजा गणपतीच्या पाठीमागे, सर्वे नं.42/2, कोथरूड, पुणे) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. दाखल फिर्यादे वरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आरोपी कृषिकेश साने (रा. मळवंडी ), मळवंडी ठुले ग्रामपंचायतचे पदाधिकारी व पोकलॅण्ड चालक मालक तसेच त्यांच्या साथीदारांनविरोधात गु.र.नं.53/2022, भा द वि कलम 447,34 जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 सह गौण खनिज कायदा 1957 सुधारित 2015 चे कलम 4 व 21 व सर्वजनित मालमत्ता विद्रूपण कायदा कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत.