बेकायदेशीर गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह एकास अटक लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई…

0
696

लोणावळा : गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसासह एक जणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत ताब्यात घेतले . ही कारवाई मंगळवार दि.14 रोजी करण्यात आली सोबतच त्याला पिस्टल पुरविणाऱ्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे .

ऋषिकेश अशोक गायकवाड ( वय 19, रा. थुगांव, पवना नगर ) याला पिस्टल व जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले असून त्याला पिस्टल पुरविणारा राजकुमार अनिल माने ( वय 23 वर्ष ) याला देखील कान्हे फाटा येथून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना गुप्त माहिती मिळाली होती की , पवनानगर परिसरात एक युवक घातक हत्यार बाळगून फिरत आहे . या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ऋषिकेश अशोक गायकवाड याला पिस्टल व जिवंत काडतुसांसह आणि त्याला पिस्टल पुरविणारा राजकुमार अनिल माने याला कान्हेफाटा वडगाव मावळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे .

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ . अभिनव देशमुख , अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , प्रभारी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , पोलीस कॉन्स्टेबल विजय गाले , रफिक शेख , संतोष शेळके , प्रविण उकिर्डे , अमित ठोसर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने करत आहेत.