बौध्द जनसेवा संघाच्या अध्यक्षपदी विजय जाधव तर उपाध्यक्षपदी संजय अडसूळे यांची निवड…

0
110

लोणावळा दि.9: रोजी सिध्दार्थ नगर येथील सार्वजनिक बैठकीत बौध्द जन सेवा संघाच्या 16 वर्ष अध्यक्ष पदाचा कार्यभार संभाळणारे प्रविण कांबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दि.9 रोजी बौध्द जन सेवा संघाची बैठक सिद्धार्थ नगर लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांच्या अध्यक्षतेखाली बौध्द जन सेवा संघाच्या अध्यक्ष पदासाठी विजय भिमराव जाधव तर उपाध्यक्ष पदी संजय बळीराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

सदर निवड ही मुरलिधर जाधव , सुरेश जाधव , धम्मरक्षित जाधव, सुनिल यादव ,अर्जुन ओव्हाळ , आर.डी.जाधव , शशींकात जाधव ,धनंजय भालेराव इत्यादी वरिष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करण्यात आले.

त्यानुसार बौध्द जन सेवा संघाच्या अध्यक्ष पदी विजय भीमराव जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी संजय बळीराम अडसुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2022 जयंती मोहात्सवाच्या अध्यक्ष पदी श्वेता नागेश सोनवणे तर उपाध्याक्ष पदी सारीका कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत रमामाता महिला मंडळाच्या सर्व महिला व मिलिंद विकास मंडळाचे तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.