Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडभक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी भिसेगावची श्री अंबे भवानी माता !

भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी भिसेगावची श्री अंबे भवानी माता !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे) हिन्दू धर्मात भक्तीपंथाचे स्थान फार मोठे आहे. देविदेवतांचे श्रद्धा ठेवून जर त्यांच्या नामाचा जप , सत्सेवा , सत्पात्रे , दान केले तर खडतर प्रारब्धसुद्धा आनंदी होते, कलियुगात वेगाने चालत असलेल्या जीवनात ईश्वरी शक्ती पूरक ठरत आहे.सर्वांचे आयुष्य आनंदमय करणारी व संकटाच्या वेळी हाक मारली असता पावणारी अशी ही आदिशक्ती श्री अंबे भवानी  माता भिसेगाव येथे आरूढ झाली आहे.
भिसेगाव हे कर्जत शहरात भिसेखिंडीच्या पायथ्याशी आहे.पूर्वी या ठिकाणी खुप जंगल होते.व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई-पुणे मार्गा कड़े जाताना या खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडीजवळ असणाऱ्या विहिरीजवळ रात्री मुक्काम करून सकाळी प्रवासाला निघत.वरती डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती. एके दिवशी एका गुजराथी व्यापाऱ्याला मुक्कामाला असताना स्वप्न पडले.स्वप्नात देवीने दर्शन दिले,आणि मी या विहीरीजवळ असणाऱ्या वारुळात आहे.
मला बाहेर काढ़,माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे.तो तुम्हाला काहीही करणार नाही. मात्र या स्वप्नाकड़े लक्ष न देता व्यापारासाठी व्यापारी पुढे निघुन गेला.काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता तसाच दृष्टांत झाला.हा सर्व वृत्तान्त त्याने आपल्या व्यापारी मित्राना सांगितला.या सर्व व्यापाऱ्यानी मिळून सत्य शोधण्याचे ठरविले.डोंगर माथ्यावरील आदिवासीना मदतीला बोलावून घेतले.
सर्वजण वारुळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुलातून तो काळा नाग आपोआप बाहेर निघून गेला.आदिवासी लोकांनी वारुळ फोडले तर काय आश्चर्य ! खरोखर देवीची सुंदर रेखीव मुर्ती त्यातून बाहेर पडली.ती मुर्ती पाहून सर्वाना आनंद झाला.आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले.
तेव्हापासून व्यापारी येता जाताना पूजा करून दर्शन घेऊन पुढे जात असत. ही देवी कोणती ? असे कुतूहल लोकांमध्ये निर्माण झाले.तेव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुलास प्रथम हात लावला त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की मी गुजरात येथील अबूच्या पहाड़ावरील श्री अंबे भवानी माता आहे. तेव्हापासून या देवीला श्री अंबे भवानी माता म्हणू लागले.

आज भिसेगाव येथे निसर्गरम्य परिसरात तसेच रेल्वे स्टेशन व एस. टी. स्टँडपासून दोन मिनिटाच्या अंतरावर श्री अंबे भवानी मातेचे भव्य मंदिर आहे.अत्यंत जागृत व नवसाला पावणारी श्री अंबा भवानी माता भक्तांच्या हाकेला धावून जाते,याची अनेकांना प्रचिती आल्याने आज श्री अंबे भवानी मातेच्या दर्शनासाठी , नवस फेडण्यासाठी भक्तांची रिघ लागलेली आहे.
सन २०२२ यावर्षी जयराम ( आप्पा ) ठोंबरे – अध्यक्ष , चंद्रकांत राऊत – चिटणीस , रामचंद्र ( मामा )हजारे – खजिनदार , रमेश दादा हजारे – उपाध्यक्ष ,रोशन ठाकरे – उपचिटणीस , सुरेश भरकले – उपखजिनदार , तर पुजारी वसंत विष्णू लोखंडे मातेचा नवरात्रोत्सव साजरा करण्यास भिसेगाव ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने दिवस रात्र नऊ दिवस मेहनत घेत आहेत .
- Advertisment -

You cannot copy content of this page