Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाभरत नागरी सहकारी पतसंस्था निवडणूक 2023 साठी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराला सुरुवात…

भरत नागरी सहकारी पतसंस्था निवडणूक 2023 साठी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराला सुरुवात…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहरातील भरत आगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत यावर्षी दोन पॅनल समोरासमोर आल्याने चूर्षीची लढत होणार आहे. पतसंस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी परिवर्तन पॅनल बनविण्यात आला असून त्याची निशाणी पतंग आहे. या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार दि.23 रोजी भांगरवाडी येथील गणपती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.
भाजपा माजी शहराध्यक्ष राजेंद्र चौहान,माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य ओ.के. जोशी हे सर्वसाधारण गटातून तर श्रिया रहाळकर महिला प्रतिनिधी व नितिन सोनवणे अनु. जाती/ माती गटातून ही निवडणूक परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून लढवत आहेत.
प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक संचालक सुभाष सोनवणे, वसंत भांगरे, आनंद नाईक, बापुलाल तारे, अनिल मालपोटे, गणेश थिटे, अविनाश ढमढेरे, भरत सातकर, विनोद होगले, गणेश इंगळे, विजय इंगूळकर, रितेश भोमे,शेखर जगदाळे, संजय सोनवणे, नंदकुमार चोरडीया, कांताराम दळवी, रवी पोटफोडे, मारुती साठे, नितिन पांगारे, गणेश मावकर, विनायक पाळेकर, प्रदीप काजळे, कांताराम दळवी, नितीन दुर्गे, योगेश दळवी, किशोर पंड्या यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पतसंस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी तसेच सभासद व नागरिकांना चांगली बॅकिंग सेवा देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी केले आहे.

You cannot copy content of this page