भवानी पेठेतील एका फ्लॅटमध्ये झालेला स्फ़ोट संशयस्पद, पोलिसांचा तपास सुरु..

0
31

पुणे : भवानी पेठेतील विशाल सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे . विशाल सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला असून स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले होते . रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅट धारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन , ओव्हन रीपेरींग चे काम करतो. सदरचा स्फ़ोट संशयस्पद असल्यामुळे पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले आहे.

भवानी पेठेतील या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही . परंतु शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे . त्याच्याकडे अनेक मोबाईल सिमकार्ड आणि पासपोर्ट आढळलेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . शेख या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेले असल्याचे समोर आले आहे . त्यामुळे हा स्फोट कशाचा झाला याचा तपास सुरू आहे . हा स्फोट नेमका वॉशिंग मशीनचा आहे कि नाही याचा तपास पोलिस करत आहेत.

हा स्फोट संशयित असण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी भवानी पेठेजवळील रेल्वे स्टेशनवर देखील एक ब्लास्ट झाला होता आणि आजचा हा ब्लास्ट, त्यामुळे कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असल्याचे समजते आहे . ही सदनिका संपूर्णरित्या रिकामी आहे . संशयित शेख हा या सोसायटीत मागील दहा वर्षापासून वास्तव्यास आहे , अशी माहिती सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद यांनी दिली . राशद शेख हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून तो मूळचा मुंबईचा आहे. सध्या तो या फ्लॅट मध्ये राहतो आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.