निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांच्या पाठीशी ” गॉड फादर मंत्री रविंद्र चव्हाण “…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत विधान सभा मतदार संघात स्थानिक पातळीवर येत असलेल्या समस्येकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जनतेच्या मनातील होणारी ” खदखद ” ओळखून समस्या सोडविण्यासाठी आगेकूच करून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत ” आशेचा किरण ” नागरिकांच्या मनात डोकावत असल्याने हेच नेतृत्व आम्हाला मतदार संघासाठी पाहिजे , असे चित्र सध्या भारतीय जनता पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांच्या नावाने चर्चा सध्या येथे होत असताना दिसत आहे .नळाला पाणी कमी येते , कचरा उचलला जात नाही , स्ट्रिट लाईट बद आहे , रस्त्यावर खड्डे पडले आहेत , वैद्यकीय मदतीची गरज आहे , रुग्णवाहिकेची गरज आहे , परिसरात दुर्गंधी पसरली आहे , वीज समस्या भेडसावत आहे , रस्ता नाही , अश्या एक ना अनेक समस्येसाठी मतदार संघात ” परिवर्तन हेल्पलाईन ” च्या माध्यमातून एक कॉल गेल्यास जनतेच्या सेवेसी सदैव तत्पर असलेले किरण भाऊ ठाकरे हे ते काम ” फत्ते ” करून त्यांचे कार्य सत्वर असल्याचे दाखवून देत आहेत.
त्यामुळे अडचणी जरी अनेक असल्या तरी पर्याय मात्र एकच , किरण भाऊ ठाकरे यांची परिवर्तन हेल्पलाईन , अशी सर्वत्र चर्चा होत असताना दिसत आहे , त्यामुळे अल्पावधीतच किरण भाऊ ठाकरे यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.भारतीय जनता पक्षाने यावेळेला कर्जत मतदार संघात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे . त्यांना एक तरुण कुणबी मराठी समाजाचा चेहरा मिळालेला आहे . भाजपाचे या मतदार संघात वाढते प्राबल्य पहाता , ग्रामीण भागापर्यंत पोहचलेला पक्ष व वाढलेले मतदार यामुळे आपण ही निवडणूक जिंकू शकतो , असा आत्मविश्वास निर्माण झाल्याने भाजपाचे कोकणचे नेते व मंत्री नामदार रविंद्र चव्हाण हे किरण भाऊ ठाकरे यांचे ” गॉड फादर ” असल्याने त्यांची संपूर्ण ताकद निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे , त्यातच त्यांची सुरू असलेली आगेकूच व मतदार संघातील भाजपाची व त्यांची ताकद बघता येणाऱ्या निवडणुकीत ते निवडणुकीस सामोरे गेल्यास निवडून येवून ” आमदार ” होण्यास वातावरण अनुकूल असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .” अभी नहीं , तो कभी नहीं ” अशी व्यूह रचना सध्या भाजपात दिसत असून प्रत्येक कार्यक्रमात किरण भाऊ ठाकरे यांची असलेली उपस्थिती व ते आयोजित करत असलेले कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय होत असून मतदारांच्या मनात ते ” घर ” करत असून प्रसिद्धीच्या झोतात आहेत.
हेच वातावरण त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरणार , असे चित्र सध्या येथे पहाण्यास मिळत आहे .तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास आमच्या परिवर्तन हेल्पलाईनच्या 9119449099 या नंबरवर अवश्य संपर्क साधा , असे मत भारतीय जनता पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.