भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरून देणार नाही – आमदार महेंद्रशेठ थोरवे..

0
310

भिसेगाव – कर्जत (सुभाष सोनावणे )भाजप आणि शिवसेनेचा विस्तव आता महाराष्ट्र भर पसरू लागला आहे . महाआघाडी सरकारला वेठीस आणण्याचे काम भाजपा सध्या करत असून महाराष्ट्रात किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून थेट शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर कुठलीही पुरावे नसलेली अलिबाग व कर्जत येथील जमीन घोटाळा प्रकरणे काढल्यावर आता शिवसेनेचे खासदार संजयजी राऊत यांच्यावर केंद्रातील ईडी मार्फत चौकशी करून लाखो रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू असताना आक्रमक झालेल्या शिवसेनेने किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका यामध्ये केलेल्या देशद्रोही भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन करण्यात येऊन किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाला त्वरित अटक करण्याची मागणी आज कर्जतमध्ये कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आमराई येथील श्रीराम पुलावर शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विक्रांत घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली असून ठिकठिकाणी यासंदर्भात निदर्शने देखील करण्यात आली , त्याचे पडसाद आज कर्जतमध्ये देखील उमटले . कर्जत येथे शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने सोमय्या यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी भाजपवर निशाणा साधत आय एन एस विक्रांत हि युद्ध नौका मोडकळीस आल्यावर सोमय्या यांनी नागरिकांकडून १०० करोड रुपये गोळा करून मा.राज्यपाल यांच्याकडे हा पैसा जमा न करता स्वतः वापरला , व यांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून देशद्रोह केला असा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला , त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर देशाशी गद्दारी करणं हे प्रकरण असल्याने सोमय्या यांना तात्काळ अटक करण्यात यावी हि मागणी केली , यासाठी ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येत आज कर्जत तालुक्यात देखील आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत कर्जत शहरात ” केंद्र सरकारचा निषेध असो , किरीट सोमय्या यांना अटक करा , गली गली मे शोर है किरीट सोमय्या चोर है , ” अशा गगनभेदी घोषणा देत , सोमय्या यांना अटक झाल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही अशा घोषणा देत केंद्र सरकारचा आणि किरीट सोमय्या यांचा निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी तसेच कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे , संघटक संतोष शेठ भोईर , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील , भाई शिंदे , शिवराम बदे , नगरसेवक संकेत भासे ,सुनील पाटील , आणि शिवसैनिक , महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते . यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी भाजपवर निशाणा साधत सोमय्या यांच्यावर आक्रमक होत त्यांच्या अटकेची मागणी केली .यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणाले की , केंद्रातील भाजप सरकार सरकारी ईडी यंत्रणेचा चुकीचा वापर करून जनतेला व महाराष्ट्र सरकारला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरू केलेले आहे , लोकांना वेठीस धरून राज्यकर्त्यांवर अन्याय गेल्या पाच वर्षांपासून सुरू केला आहे.

याचे चित्र सर्वत्र पहाण्यास मिळत आहे . केंद्रातील यंत्रणेने महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने चौकशी लावून अटक करण्यात आली आहे . आम्हाला आदेश मिळाल्यास भाजपाचा एकही कार्यकर्ता रस्त्यावर फिरून देणार नाही , अशी आरोळी फोडत देशद्रोही किरीट सोमय्या व त्याच्या मुलाला त्वरित अटक करावी , अशी मागणी त्यांनी केली.