भाजपा प्रभारी पदाची जबाबदारी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्यावर…

0
66

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या तोंडावर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्याकडे देऊन त्यांना लोणावळा शहर भाजपाचे प्रभारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपा महामंत्री श्रीकांत भारती,माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे , भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , भाजपा गटनेते देविदास कडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषदेने मागील पाच वर्षाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करत शहराच्या बहुतांश भौतिक गरजा पुर्ण केल्या . स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग चार वर्ष देशपातळीवर नामांकने मिळविली. त्यांच्या या वाटचालीमध्ये श्रीधर पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे . पुजारी हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत . भाजपाचे लोणावळा शहराध्यक्ष पद देखील त्यांनी दोनवेळा भुषविले आहे . संघटना बांधणीचा त्यांचा दांडगा अनुभव ध्यानात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.