Tuesday, November 29, 2022
Homeपुणेमावळभाजपा लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे...

भाजपा लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची निवड…

मावळ ( प्रतिनिधी ): मावळ विधानसभेचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांची भाजपा लोकसभा प्रवास योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.भेगडे यांना सदर नियुक्तीचे पत्र प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात आले.
भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपा लोकसभा प्रवास योजनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून काम पहात होते . मात्र त्यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने या पदासाठी भेगडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती . त्यानुसार ही निवड जाहिर झाली आहे .
बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून भाजपाचे लोकसभेचे प्रमुख राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याशी देखील त्यांचे जवळचे संबंध आहेत . भेगडे हे मावळ विधानसभेचे दोन वेळा आमदार राहिले असून काही काळ राज्यमंत्री होते . त्यांनी यापुर्वी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष पद , तसेच सोलापूर विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली .त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र प्रदेशावरील पक्षाची विविध पदे व जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत . गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे . त्यांचा स्वभाव नम्र मनमिळाऊ असल्याने त्यांच्यावर पक्षाने ही मोठी जबाबदारी दिली आहे . दरम्यान भेगडे यांच्यावर पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . जिल्ह्यातील कार्यकत्यांनी त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचलीस शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page