भाजप सरकार विरोधात लोणावळा काँग्रेसचे उपोषण…

0
250

लोणावळा : महाराष्ट्र शासनाने कोरोना साथरोग योग्य प्रकारे हातळली असताना देखील , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कोरोना काळात महाराष्ट्रातून कोरोनाचा स्फोट झाला , महाराष्ट्रामुळे इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असे वक्तव्य करत महाराष्ट्राचा अपमान केला.तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत भाजप सरकार महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर कुरघोड्या करत असल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहर काँग्रेसने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे उपोषण करण्यात आले असून यामध्ये लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर , माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , युवक अध्यक्ष दत्तात्रय दळवी , बाबुभाई शेख , रवी सलोजा , मारुती तिकोणे , सुबोध खंडेलवाल , जितेंद्र कल्याणजी , सुर्यकांत औरंगे , गणेश रगडे , योगेश गवळी , सर्फराज शेख , फिरोज बागवान , नितिन नगरकर , मारुती राक्षे , आकाश परदेशी , सनी गवळी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.