भिलारे वस्ती येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मयूर ढोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न..

0
57

वडगाव : वडगाव शहरातील प्रभाग भिलारे वस्ती भागातील रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय आज मार्गी लागला आहे.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.13 भिलारे वस्ती येथील अनेक वर्ष प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी पुढाकार घेत स्थानिक नगरसेविका सुनिता खंडु भिलारे व नगरसेवक दिलीपराव म्हाळसकर यांच्या सहकार्याने तसेच स्थानिक लहु भिलारे, संतोष पांडुरंग भिलारे, प्रशांत भिलारे, दिलीप म्हाळस्कर, हनुमंत म्हाळस्कर, शंकरराव म्हाळसकर, नवनाथ भिलारे, सोपानराव मधुकर म्हाळस्कर, गणेश म्हाळस्कर,अरुण भिलारे या जागामालक शेतकऱ्यांशी मध्यस्थी करत संबंधित रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे .

या भागातील रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त ड्रेनेज लाईन या विकासकांमासाठी आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीतून सुमारे 47 लाख 37 हजार रुपये इतका निधी मिळाला असून या कामांचे भूमिपूजन शुभारंभ नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी स्थानिक जागामालकांसह नगरसेवक राजेंद्र कुडे, दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे, खंडू भिलारे, रामभाऊ भेगडे,अरुण भिलारे, सुदाम भिलारे, बाळासाहेब भिलारे, गोपाळ भिलारे, सूर्यकांत भिलारे, सद्गुरु भिलारे, सागर म्हाळसकर, विलास भोंडवे आदीजण उपस्थित होते.

यावेळी सर्व जागामालक शेतकरी बांधवांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी आभार मानत पुढील काळात आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या माध्यमातून या भागासाठी अजून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन मयूर ढोरे यांनी दिले.