Friday, June 9, 2023
Homeपुणेमुळशीभुकूम ग्रामपंचायत च्या सरपंच पदी मयुरी आमले तर उपसरपंच पदी अंकुश खाटपे…

भुकूम ग्रामपंचायत च्या सरपंच पदी मयुरी आमले तर उपसरपंच पदी अंकुश खाटपे…

मूळशी (प्रतिनिधी):मुळशी तालुक्यातील भुकूम या गावच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित सरपंच मयुरी आमले ह्या उपसरपंच अंकुश खाटपे यांची बहीण असून आता भुकूम गावचा कारभार बहिण भावाकडे आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भुकूम ग्रामपंचायतचा कारभार इथून पुढे हे दोघे बहिण भाऊ एकत्र पाहणार आहेत.
मयुरी आमले आणि अंकुश खाटपे हे सख्खे मावस भाऊ बहीण आहेत. भुकूमच्या माजी सरपंच गौरी प्रसाद भरत वंश यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिकामी झाली होती.त्यानंतर मयुरी आमले यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची यापूर्वीच निवड झाली होती.
दरम्यान भुकूम गावाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सख्खे मावसभाऊ बहीण सरपंच आणि उपसरपंच झाल्याने नागरिकांकडून कौतुक केले जात असून भुकूम ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच यांची भुकुम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत मिरवणूक काढली.तसेच गावचा कारभार आता महिलेच्या हाती आल्यामुळे गावच्या विकासाला मोठा हातभार लागेल अशी भावना देखील काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page