“भ्रष्टाचारी भाजप चले जाव ” चा नारा लावत राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा…

0
64

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस चा पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात “भ्रष्टाचारी भाजप चले जाव ” चा नारा लावत मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या हाती सत्ता आणायची आहे.गेल्या पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटी च्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील मुले भावांडांना ठेका देऊन पैसे लाटले अशी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत असे असे ते म्हणाले तसेच याबाबत मी सातत्याने आवाज उठवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाविकास आघाडीच्या संबंधित मंत्र्याकडे देखील पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला . त्यामध्ये शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, बापू दिनकर कातळे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.