कार्ला दि.2: सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने वेहेरगाव येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरोना विषाणूची दुसरी लाट येताच मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मंदिरे बंद करण्याचे निर्बंध लावले आहेत. ते निर्बंध शिथिल करावेत अथवा मंदिरामध्ये दर्शनासाठी वेळेचे निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये ‘ श्री.एकविरा देवस्थान ट्रस्ट’ प्रवेशद्वार येथे हे आंदोलन शांततेत पार पडले.
यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र गारुडकर, उपाध्यक्ष हेमंत संबूस, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते,मावळ तालुका नेते अशोक कुटे, मा. उपाध्यक्ष योगेश हुलावळे, लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, नरेंद्र तांबोळी,सचिन पांगारे, अनिल वरघडे, मोझेस दास, पंकज गदिया,भरत बोडके, संजय शिंदे, पांडुरंग असवले, निरंजन चव्हाण,विजय भानुसघरे, किरण गवळी, जॉर्ज दास, रमेश म्हाळस्कर, संदीप पोटफोडे, अमित बोरकर, नाथा पिंगळे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.