Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनःस्वास्थ्य सुधारण्यासाठी विद्यार्थी - तरुण व नागरिकांना " समुपदेशन " हेच सर्वश्री...

मनःस्वास्थ्य सुधारण्यासाठी विद्यार्थी – तरुण व नागरिकांना ” समुपदेशन ” हेच सर्वश्री कवच कुंडले – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आज कालच्या धावपळीच्या जगात व स्पर्धेच्या युगात आपण ” अव्वल ” रहाण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे . मात्र शालेय जीवनापासूनच आपल्याला अधिक ऊर्जेची व शरिराला पोषक असे ” कवच कुंडले ” रुपी समुपदेशन ज्ञान मिळाल्यास शरीरातील ७२ हजार नसांना हि ताकद मिळून ” मन – मस्तिष्क व मनगट ” मजबूत होवून आपण त्या बळावर भविष्यात कधीही न डगमगता ” गरुड भरारी ” घेवून आपण ” सर्वोच्च स्थळी ” पोहचू शकतो , मात्र त्यासाठी योग्य वेळी – योग्य वयात – स्थिर स्थावर होण्यासाठी योग्यतेचे ” समुपदेशन ” होणे गरजेचे असते , असे बहुमूल्य मत कर्जत येथील ” मनस्वास्थ्य क्लिनिकच्या ” प्रसिद्ध समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या शरीरात मन हे खूप मोठे कार्य करत असते . मनाची अंतरंगता प्रत्येक सेकंदाला हजारोंच्या गतीने वेध घेत असते . असेच हजारो विचार या मनात साठल्यावर त्याचा अपघात झाल्यास ? काय होईल याचा विचार न करणेच बरे , म्हणूनच या मनाची स्थिती सदृढ ठेवण्यासाठी या मनाची डागडुजी करणे , म्हणजेच समुपदेशन . यावर समुपदेशक देवश्री जोशी यांनी प्रकाश टाकत समुपदेशन म्हणजे काय , याची शरीर व मनाला गरज का आहे , कोणाला , व कशासाठी आहे , तसेच शरीर आणि मन ह्याचा एकमेकांशी काय संबंध आहे , हे सर्व जाणून घेतल्याशिवाय विद्यार्थी तसेच मनावर आघात झालेल्या तरुणाईला , महिला व पुरुषांना नैराश्यातून बाहेर पडणे अशक्य आहे.

आपल्या मनाची असणारी स्थिती म्हणजे ” मनस्वास्थ्य “. खूप लोक मनाला वेगळं मानतच नाहीत . आपल्या मनालाही डागडुजीची गरज असते , त्याला हि वेगवेगळ्या व्हिटॅमिन – प्रोटीन्सची गरज असते , त्रयस्तपणे बघण्याची गरज असते, शांततेत बसून मनात काय विचार आहे हे जाणून घेण्याची गरज असते. आज ग्रामीण आणि शहरी भागातही , इतकी वर्ष कुठे होत मन , मनाचा डॉक्टर , मनासंबंधातले प्रश्न ,असे अनेक प्रश्न कुटुंबातील सदस्य उपस्थित करतात . वर्षानु वर्षे जीवन सुरु आहे , शरीरातून आत्मा गेल्यावर माणूस देहातून नष्ट होतो , हे सगळं मान्य आहे पण शरीरासोबतच ” मन ” नावाचा अवयव सगळ्यांना आहे. माणसापासून ते प्राण्यापर्यंत (पक्षी, जलचर प्राणी ) , ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे , त्यांच्या शरीरामध्ये मन आहे.

मग मनाचा आणि समुपदेशन ह्याचा काय संबंध आहे ? तर जसा शरीराच्या प्रत्येक अवयवाचे डॉक्टर्स असतात, स्पेशालिस्ट असतात , मग छातीचा डॉक्टर असुदे किंवा सर्दी ताप ह्या आजारांचे जसे वेगवेगळे डॉक्टर्स असतात तसेच मनाचे डॉक्टर्स हे ” समुपदेशन ” असतात. ज्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार आहेत , अभ्यासात लक्ष न लागणं , जे एकट्यामध्ये बडबड करणं , कोणीतरी दिसणं, सतत उदास बसून राहणं, आत्महत्याचे सतत विचार येणं , व्यसनाधीन होण , ह्या सर्व समस्या मानसोपचारतज्ञ (psychiatrist), तसेच या विविध समस्या कोणाशी तरी म्हणजे त्या विषयातल्या तज्ञांशी बोलल्यानंतर सुटू शकतात किंवा पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकतात , ह्या साठी असतात समुपदेशक (counselor). तुम्ही समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञ कोणाकडेही गेल्यास तुमची सर्व माहिती ही गोपनीय ठेवण्यात येते.
आजूबाजूचे लोकं काय म्हणतील, मला थोडीचं वेड लागलय का ? काही दिवस झाले कि आपोआप बरा होईल मी, कोणी सांगण्याची, किंवा अक्कल शिकवण्याची मला गरज नाही , असे कुठेलेही भ्रम न ठेवता , माझ्या मनाला गरज आहे कोणीतरी निर्णयाक (non -judgemental) समजून घेण्याची. आयुष्यामध्ये कुठल्या पण वळणावर अश्या समस्या येऊ शकतात तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच मनावर पण औषोधोपचार झाले तर ते मन खूप ताजतवानं, टवटवीत राहतं.

आयुष्यमध्ये अशी एकपण समस्या नाही की जी बोलून, विचार मंथन करून त्यावर मार्ग मिळू शकत नाही. प्रत्येक समस्येवर उत्तर हे असतंच पण तुम्ही कोणाशी बोलत आहात हे सर्वात महत्वाचे आहे , म्हणूनच मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ह्या संबंधी विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत कोणाला काही प्रश्न असतील, समस्या असतील तर तुमची सगळी माहिती आमच्याकडे गोपनीय ( confidential ) ठेवून माफक फी घेवून समुपदेशन करून १०० टक्के सोडविली जाईल , म्हणून आजच समुपदेशक देवश्री जोशी , मोबाईल नंबर – 9527676008 , कर्जत रायगड , या नंबरवर संपर्क करावा , आपल्या समस्या ऑन लाईन देखील सोडविल्या जातील , असे आवाहन देवश्री जोशी यांनी केले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page