मनशक्तीच्या सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

0
34

लोणावळा दि.14: लोणावळा येथील दत्त कुटीर या स्वामी विज्ञानानंद यांच्या तपोभूमीत मनशक्ती केंद्राच्या सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

गीता जयंती व मोक्षदा एकादशीचे औचित्य साधून या सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ करताना जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व वरसोली सरपंच सारिका खांडेभरड यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले तर बाळा भेगडे यांच्या हस्ते डिजिटल नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

विज्ञान व तंत्रज्ञान यातून ज्ञानदानाचा संदेश देणारे मनशक्ती केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी ज्याठिकाणी तपश्चर्या केली अशा लोणावळ्यातील दत्त कुटीर या तपोधाम वास्तुमध्ये या सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमात लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग, तरुणांसाठी इंग्लिश संभाषण प्रशिक्षण, वैद्यकीय सेवा व महिलांसाठी गीता वर्ग मोफत घेतले जाणार असल्याची माहिती उमा चंदने यांनी दिली.

मनशक्तीच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांना ज्ञान साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच पाहुण्यांच्या वतीने मनशक्ती केंद्राच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, व्यवस्थापकीय विश्वस्त गजानन केळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, प्रज्ञाताई केळकर, प्रल्हाद बापर्डेकर, सुरेश साखवळकर, लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष संजय पाटील, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, नगरसेवक राजू बच्चे, ब्रिंदा गणात्रा, सुधीर शिर्के, संजय खांडेभरड यांसमवेत पत्रकार बंधू व अनेक मान्यवर उपस्थित होते.