मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मावळ मनसैनिकांची पदे होणार जाहीर..

0
158

मावळ : आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पद वगळता इतर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून पुढील काही दिवसात नवीन कार्यकारिणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी दिली.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पद वगळता तालुक्याची सध्या अस्तित्वात असणारी मुख्य व सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदे व त्यांची कार्यकारणी दिनांक 9/5/2022 रोजी झालेल्या तालुका बैठकीत एकमताने ठराव करून बरखास्त करण्यात आली असून या पुढे महाराष्ट्र सैनिक हे पद सर्वांसाठी अबाधित राहील.

तसेच कोणीही पूर्वीच्या पदाचा वापर किंवा प्रसार या पुढे करू नये अथवा तसे केल्यास आपण पक्षशिस्त भंगाच्या कारवाईस पात्र ठराल याची सर्व मनसैनिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे आज गठीत केलेल्या दहा सदस्यीय कोअर कमिटीचा नियोजित मावळ तालुका दौरा पूर्ण झाल्या नंतरच सर्व सेलची तालुका कार्यकारणी व पदे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पत्र देऊन नियुक्त केली जाईल असे रुपेश म्हाळसकर यांनी पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे.काल घेण्यात आलेल्या तालुका बैठकीस पिंपरी चिंचवड चे नगरसेवक व मावळ तालुका प्रभारी सचिन चिखले,तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,सचिन भांडवलकर,सुरेश जाधव,पांडुरंग असवले,अनिल वरघडे,संजय शिंदे, संतोष मोधळे,भारत चिकणे,तानाजी तोडकर,राहुल मांजरेकर,गणेश भांगरे,संदीप शिंदे,किरण गवळी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.