मनसे ची नाणे मावळ विभाग आढावा बैठक शिलाटणे येथे उत्सहात संपन्न..

0
59

कार्ला प्रतिनिधी दि-3: महाराष्ट्र नवनिर्माणसेना मावळ तालुका कोर कमिटी व मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या उपस्थितीत काल नाणे मावळ विभाग नूतन कार्यकारणी जाहीर करणे तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शिलाटणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या पद निवडीबाबत तसेच पक्ष संघटना वाढी व पुनर्बांधणी संदर्भात महाराष्ट्र सैनिकांशी चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतिनीशी लढवणार असून तरी सर्व इच्छुकांनी कामाला लागावे अशा सूचना यावेळी कोर कमिटीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

याप्रसंगी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,मनसे रस्ते आस्थापना व साधन सुविधा पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर,कोर कमिटी सदस्य सुरेश जाधव,संजय शिंदे,तानाजी तोडकर,अनिल वरघडे,योगेश हुलावळे,संतोष खराडे,अनंता तिकोणे ,सुनील साळवे, महेंद्र शिंदे,नाथा पिंपळे तसेच बहुसंख्येने मनसैनिक उपस्थित होते, बैठकीचे आयोजन संग्राम भानुसघरे यांनी केले होते.