Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनसे च्या ताकदीने " सुधाकर भाऊ घारे " मोठ्या मताधिक्याने निवडून येणार...

मनसे च्या ताकदीने ” सुधाकर भाऊ घारे ” मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – जितेंद्र दादा पाटील..

कर्जतमध्ये मनसे चा ” संवाद मेळावा ” संपन्न…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही महायुती सोबत असताना या मावळ लोकसभा मतदार संघात खासदार आप्पा बारणे हे या मतदार संघातील मनसे च्या सव्वा लाख कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडून गेले , हे न विसरता आताही या मतदार संघात आमची असलेल्या ” ताकदीच्या ” जोरावरच ” परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे ” हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील , असे भाकीत महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी केले , ते कर्जत मध्ये रॉयल गार्डन च्या भव्य सभागृहात शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता ” महाराष्ट्र सैनिक संवाद मेळावा ” आयोजित केला होता , त्यावेळी बोलत होते .

या कर्जत विधानसभा महाराष्ट्र सैनिक संवाद मेळाव्यास मनसे नेते तथा पक्ष प्रवक्ते प्रकाश महाजन , जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , सचिन करणुक , खंडागळे , अक्षय महाले , विजय चव्हाण , कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे , कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे , अनिरुद्ध जोशी , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .यावेळी जितेंद्र दादा पाटील पुढे म्हणाले की , ” मी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा ” असे म्हणणारे एकमेव मराठी नेता म्हणजे राज साहेब ठाकरे , या राज्यात नवनिर्माण करण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे . ७५ वर्षे झाली अजून पाणी – रस्ते आणि गटारे या गरजा कुणाला पूर्ण करता येत नाहीत , असे संतप्त मत व्यक्त करत सर्वाँना मनसे संपली आहे असा समज तयार झाला आहे , राज साहेब यांचा आदेश अखेरचा असून या मतदार संघात ” रिक्षेला इंजिन ” लावल आहे , आता रिक्षा सुसाट पळणार असून ” विजयी ” परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांचाच होणार आहे , असे मत व्यक्त केले .

या निवडणुकीत मनसे उमेदवार बद्दल ना – ना शंका घेतली , पण मी प्रामाणिक होतो , राज साहेब म्हणतात ” लढू नको पण विकला जाऊ नको ” , पण हा हॉल भरलाय हे सर्व राज साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत , कर्जत मतदार संघातील परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना राज साहेबांनी पाठींबा दिल्यावर येथे ” भूकंप ” झाला , लोकसभेसारखेच आताही या मतदार संघात मनसे च्या ताकदीवर आम्हीच विजयी होणार आहे . कोरोना काळात या मतदार संघात पतपेढी , बँक , ज्या ज्या महिला भगिनींनी कर्ज घेतले होते त्यांना त्रास देत होते अश्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहिली , यावर प्रकाश त्यांनी टाकला . विचार मोठे असतात हे ” बाळासाहेब नंतर राज साहेब ” यांच्याकडेच आहेत , या मतदार संघात मनसे सैनिकांच्या साथीने उमेदवार सुधाकर भाऊ घारे मोठ्या संख्येने निवडून येणार , हे भाकीत त्यांनी केले . परकीय भाषा उलथवून टाकणारे , येथे रोजगार देणारे , महिलांचे रक्षण करणारे , मराठी भाषा टिकवणारे राज साहेबच आहेत , येथील असलेली मनसेची सर्व ताकद सुधा भाऊंच्या पाठीशी उभी आहे , येथील दादागिरी , ठेकेदारी सपुष्टात आणण्यासाठी परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांना ” रिक्षा ” चिन्हावर मत देवून मोठ्या संख्येने निवडून दया , असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी उपस्थित सर्व मनसे सैनिकांना , व या मतदार संघातील मतदार राजाला व महिला भगिनींना केली . यावेळी रॉयल गार्डन हॉल खचाखच भरला होता .

यावेळी प्रवक्ते प्रकाश महाजन , सचिन कर्णुक , विजय चव्हाण , यशवंत भवारे , खंडागळे यांनी देखील मार्गदर्शन केले . तर मधुकर भाऊ घारे यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या . आज जितेंद्र दादा पाटील यांचा ” वाढदिवस ” देखील असल्याने केक कापून , त्यांना अनेक मान्यवर , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या . यावेळी अनेकांना पदे देवून नियुक्ती पत्र देण्यान आली .
- Advertisment -

You cannot copy content of this page