Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमनसे जिल्हाध्यक्ष चषक - २०२३ प्रकाश झोतातील क्रिकेट सामने कर्जत तालुक्यात चर्चेत...

मनसे जिल्हाध्यक्ष चषक – २०२३ प्रकाश झोतातील क्रिकेट सामने कर्जत तालुक्यात चर्चेत !

जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांचे उत्कृष्ट नियोजन..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) तरुणांचे आधारस्तंभ व संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या तडाखेबाज ठाकरी विचारांनी नेहमीच चर्चेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचे आदेशाने व युवा मनसे प्रमुख अमित साहेब ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष मा. जितेंद्र दादा पाटील यांच्या प्रेरणेने कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आयोजित ” मनसे जिल्हाध्यक्ष चषक – २०२३ ” , हे प्रकाश झोतातील क्रिकेट सामने कर्जत तालुक्यातील गारपोली येथे भव्य मैदानात आकर्षित बक्षिसांसहित जिल्हाध्यक्ष ” जितेंद्रदादा पाटील ” यांनी आयोजित केले आहेत.
दि.२९ मार्च ते १ एप्रिल २०२३ ओव्हर आर्म , मर्यादित शटकांचे हे प्रकाश झोतातील सामने पाहण्यास कर्जत तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावून आपला आनंद द्विगुणित केला. या क्रिकेट सामान्यांचे उदघाटन मनसेचे नेते शिशिर सावंत यांच्या शुभहस्ते बुधवारी २९ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या क्रिकेट सामन्यांत एकूण ३२ टिम चा सहभाग असून दर दिवशी ८ क्रिकेट सामने होणार आहेत . प्रवेश फि १७५०० /- रू . इतकी असून कमिटी कडून टी शर्ट दिले जाणार आहेत . त्यामुळे सामने पहाताना आपण ” आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने ” बघतोय असेच क्रिकेट प्रेमींना वाटत आहे .अतिशय उत्कृष्ट नियोजन जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी केले असून हे क्रिकेट सामने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

या प्रकाश झोतातील सामन्यांना भरघोस बक्षिसे असून पहिले पारितोषिक १ लाख ५० हजार रू. व आकर्षक चषक , द्वितीय क्रमांकास ७५ हजार व आकर्षक चषक , तृतीय क्रमांकास ३५ हजार व आकर्षक चषक , तसेच चौथ्या क्रमांकास देखील ३५ हजार रू. व आकर्षक चषक पारितोषिक म्हणून मिळणार आहे , तसेच मालिकाविरास दोन चाकी बाईक व आकर्षक चषक , उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांस कुलर व आकर्षक चषक , उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास शूज व आकर्षक चषक असे पारितोषिक असून हे पारितोषिक जिंकण्यासाठी सर्वच टिम चे खेळाडू आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवून विजयी होण्याचा प्रयत्न त्यांच्या खेळातून दिसून येत होता .मात्र अखेरच्या दिवशी कुठले संघ पोहचून प्रथम क्रमांकावर आपला विजयी ” मोहर ” लावणार , हे पाहण्यास सर्वांचेच लक्ष लागून आहे .संदीप बोराडे , सोमणे यांचे उत्कृष्ट समालोचन ऐकून क्रिकेट प्रेमींना उत्साह वाटत आहे .

You cannot copy content of this page