मनसे युवानेते अमित बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाना खाऊचे वाटप…

0
26

लोणावळा : मनसे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमितभाऊ बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांगरगाव येथील आशाघर अनाथाश्रम येथे खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी अनाथांचा आनंद द्विगुणित करत सदर कार्यक्रमात अनाथ बालकांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळस्कर , संतोष म्हाळस्कर , स्वप्नील न्हालवे , अनिकेत जांभुळकर , राकेश जांभुळकर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.