if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) क्रिकेट खेळ रायगड जिल्ह्यात मुंबई पेक्षा जास्त प्रमाणात खेळला जात असून खेळाडूंच्या अंगातील खेळ व त्यांना स्फूर्ती देण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील दरवर्षी प्रकाश झोतातील ” ओव्हर आर्म क्रिकेटचे मर्यादित षटकांचे सामने ” भरवून करत असून स्टेडियम मधील केलेल्या सर्व नियोजनाची स्तुती महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेना प्रमुख अमित साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा १८ व्या वर्धापन दिनानिमित्त ” मनसे रायगड चषक – २०२४ चे ” आयोजन कर्जत तालुक्यात जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील व भैरवनाथ क्रिकेट असोसिएशन गारपोली – कर्जत यांच्या पुढाकाराने ३ रे पर्व बुधवार दिनांक ०६ मार्च ते ०९ मार्च २०२३ रोजी प्रकाश झोतातील ” ओव्हर आर्म क्रिकेटचे मर्यादित षटकांचे सामने ” आषाणे – कर्जत येथे आयोजित करण्यात आले असता त्याचे उद्घाटन आज अमित साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले , यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवरांच्या उपस्थितीत अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी सामन्यांचे उद्घाटन झाल्यावर स्वतः क्रिकेट मैदानावर बॅटिंग करून त्यांनी आपला खेळ दाखवला तर त्यांना जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी बॉलिंग केली . या सामन्यामध्ये सन्माननीय श्री. मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित साहेब ठाकरे व नेते नितीन सरदेसाई यांच्यासह अनेक रायगड जिल्ह्यातील नेतेगण पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक १,५०,०००/- रू. व आकर्षक चषक , द्वितीय क्रमांक ७५,०००/- रू. व आकर्षक चषक , तृतीय क्रमांक ३५,०००/- रू. व आकर्षक चषक , चतुर्थ क्रमांक ३५,०००/- रू. व आकर्षक चषक ठेवण्यात आले असून मालिकावीर यांस बाईक व आकर्षक चषक , उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज सायकल व आकर्षक चषक , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुलर व आकर्षक चषक अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
विशेष आकर्षण म्हणून प्रेक्षकांसाठी दररोज ” लकी ड्रॉ ” काढण्यात येणार आहे.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , जिल्हा सचिव अक्षय महाले , जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक , तालुका अध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर , उपतालुका अध्यक्ष भूषण राणे , समीर चव्हाण तालुका सचिव , माजी तालुका सचिव प्रदीप पाटील , कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे , मा. नगरसेवक हेमंत ठाणगे , शहर उपाध्यक्ष संकेत घेवारे , मा. शहर उपाध्यक्ष रांकीत शर्मा , महाराष्ट्र सैनिक महेश लोवंशी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.